मुंबई महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू असताना ठाकरे बंधूंसमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. तब्बल १८ वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत युतीची घोषणा केली असली, तरी मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांनी बंडखोरी केल्याचं चित्र समोर आलं आहे.
महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी जागावाटपाचं सूत्र निश्चित करत उमेदवार जाहीर केले. मात्र उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत थेट बंडाचा पवित्रा घेतला आहे. विशेष म्हणजे ही बंडखोरी तब्बल ८ प्रभागांमध्ये झाल्याची माहिती समोर येत आहे.
या घडामोडींमुळे ठाकरे बंधूंच्या युतीसमोर मोठं आव्हान उभं राहिलं असून, निवडणुकीआधीच अंतर्गत असंतोष चव्हाट्यावर आला आहे. बंडखोर उमेदवारांमुळे युतीचं गणित बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
#BMCElection
#ThackerayBrothers
#MumbaiPolitics
#MunicipalElection
#TirangaTimesMaharastra
